Social Activites

श्री अंबाबाई दर्शनासाठी विविध भागातून भक्त दर्शनासाठी येत असतात. श्री अंबाबाईचे दर्शन घेतले नंतर भक्तांना दररोज मोफत प्रसादाची सोय करणेत आलेली आहे . यामध्ये प्रसाद म्हणून अल्पोपहार , खिचडी किंवा महाप्रसादाची सोय करण्यात आलेली आहे.


संस्थेमार्फत मंदिर परिसर स्वच्छ राहावा यासाठी स्वच्छता मोहीम राबिविली जाते. तसेच शहर व ग्रामीण भागातील मंदिर व शाळा परिसरासाठी स्वच्छता मोहीम राबिवली जाते. वृक्षारोपण व वृक्ष संगोपन इ. सामाजिक कार्य संस्थेमार्फत केले जाते.


संस्थेमार्फत गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्यासह आर्थिक मदत केली जाते. तसेच यामध्ये जे गुणवंत मुले व मुली आहेत त्यांचा सत्कार संस्थेमार्फत केला जातो.


अंध , अपंग , मतिमंद , मूकबधिर, कर्णबधिर, कुपोषित गरीब मुलांना आर्थिक मदत करून मोफत अन्नदान केले जाते. नैसर्गिक आपत्तीवेळी छात्र , रुग्ण यांचेसाठी आर्थिक मदत व मोफत अन्नदान केले जाते. याशिवाय इतर सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबविले जातात.


श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना त्यांच्या गरजेनुसार सेवा देणे हे आमचे कर्तव्य असून हे सर्व दानशूर लोकांच्या मदतीने शक्य होत आहे. या कार्यासाठी आपले कडून देणगी देऊन सहकार्य करावे.